फेणीवरील करात सवलत देण्याचा विचार ः मुख्यमंत्री

0
106

अबकारी खात्याला मद्यावरील अबकारी कर वाढीवर फेरविचार करण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकार फेणीवरील करात सवलत देण्यावर विचार करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील मद्य विक्रेत्यांच्या एका शिष्टमंडळाला काल दिली.

राज्यातील मद्य विक्रेत्या संघटनेच्या एका शिष्टमंडळाने आल्तिनो पणजी येथे सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेटी घेतल्यानंतर संघटनेचे दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली.

मद्यावरील शुल्कात वाढ केल्यास देशातील इतर राज्याच्या तुलनेत राज्यातील मद्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. मद्यावरील वाढीव शुल्कात कपात करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. गोव्यात ५० टक्के मद्य दरवाढ होणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. मात्र ही वाढ २ ते ५ टक्के असू शकते, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.