फसवणूक प्रकरणातील संशयित अखेर अटकेत

0
12

हावडा-कोलकाता येथील पोलिसांना एका फसवणूक प्रकरणात हवा असलेला संशयित आरोपी ग्रेविले एरिक हेन्री (37, रा. ठाणे-महाराष्ट्र) याला ताब्यात घेण्यात जुने गोवे पोलिसांना यश प्राप्त झाले. हावडा कोलकाता गोलाबारी पोलिसांनी संशयित आरोपी जुने गोवे पोलीस स्थानकाच्या हद्दीत असल्याची माहिती दिली होती. या संशयिताला शोधण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी करमळी, दिवाडी, जुने गोवे आणि खोर्ली या भागात दोन दिवस शोध मोहीम हाती घेऊन संशयित आरोपी हेन्री याला ताब्यात घेण्यात यश मिळविले. त्यानंतर त्याला हावडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.