फसवणुकीबाबत सावध राहण्याचे सायबर गुन्हा विभागाचे आवाहन

0
5

कर्जाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने केले आहे. माफक व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. गोवा पोलिसांनी आपल्या सोशल मीडियावरील विविध चॅनेल्सलच्या माध्यमातून जनजागृतीला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी संपर्क साधणाऱ्या व्यक्तीची पूर्ण पडताळणी केली पाहिजे. त्या व्यक्तीला आधार कार्ड क्रमांक किंवा पॅन क्रमांक देऊ नये. याबाबत नागरिकांना कुठल्याही प्रकारची संशयास्पद गोष्ट आढळून आल्यास त्वरित सायबर गुन्हा विभाग किंवा 1930 हा हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सायबर गुन्हा विभागाने केले आहे.