सरकारने फलोद्यान महामंडळाच्या गाड्यांवरून भाजीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती आज महामंडळाचे चेअरमन आमदार प्रवीण झांट्ये यानी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या परराज्यातून भाजी आणली जात नाही, पण आता ती आणून येत्या सोमवारपर्यंत फलोद्यान महामंडळाच्या दालनांवरून भाजीचा पुरवठा केला जाणार असल्याचे झांट्ये यानी स्पष्ट केले.