फर्मागुढीत गुढीपाडव्याला मराठी राज्य भाषेची गुढी

0
133

मराठी राजभाषा समितीतर्फे येत्या गुढीपाडव्याला मराठी राज्य भाषेची गुढी उभारण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. २१ रोजी सकाळी ८.३० वाजता फर्मागुढी, फोंडा येथील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याजवळ ही गुढी उभारण्यात येणार आहे. मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक गो. रा. ढवळीकर यांनी केले आहे.