प्रशासन गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अधिकार्‍यांना निर्देश

0
168

>> प्रशासकीय अधिकार्‍यांबरोबर मंत्रालयात घेतली आढावा बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी राज्य प्रशासनातील आयएएस, आयपीएस आणि आयएङ्गएस अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन प्रशासन गतिमान बनविण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या कार्यकाळाचे शंभर दिवस पूर्ण केल्यानंतर प्रशासन अधिक गतिमान बनविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रशासकीय पातळीवर आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. प्रशासनातील आयएएस अधिकार्‍यांची बैठक घेऊन लोकांना सुशासन देण्यासाठी विविध विषयांवर चर्चा केली. अधिकार्‍यांनी नवी आव्हाने पेलण्यासाठी आपली कार्यक्षमता आणखीन वाढवावी. निर्धारित वेळेत दिलेल्या जबाबदार्‍या पार पाडण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.

सचिव आणि विभाग प्रमुखांना सरकारच्या अंमलबजावणी करण्यात येणार्‍या सर्व योजनांचा आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारच्या काही योजना केंद्रीय योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांना केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.

महसूल विभागातील अधिकार्‍यांना महसूल वाढविण्यासाठी कृती योजना तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी ङ्गील्ड ऑङ्गिस आणि प्रकल्प साइट्सना नियमित भेटी देऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती, समस्या जाणून घ्यावी. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण प्राथमिक स्तरावर वेळेवर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

पोलीस अधिकार्‍यांच्या बैठकीत कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. महिला व मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांकडे लक्ष केंद्रित करावे. संवेदनशील प्रकरणांविषयी तपास आणि गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासासाठी माहिती तंत्रज्ञान अधिकार्‍यांची मदत घ्यावी, अशी सूचना करण्यात आली.

आयएङ्गएस अधिकार्‍यांशी झालेल्या बैठकीत पर्यावरण आणि वन्य जीवन पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा. तसेच आदिवासी समाजातील नागरिकांचे वन हक्क दाव्यांचे जलद गतीने निराकरण करण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.