गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने काल आपल्या आठ गट अध्यक्षांची निवड केली. त्यात रुद्रेश देशप्रभू (पेडणे), कृष्णा नेने (वाळपई), रमेश शिरोडकर (पर्ये), विशाल वळवईकर (कुंभारजुवे), मेल्विन फर्नांडिस (वास्को), चंदा वेळीप (सांगे), आबेल बोर्जिस (काणकोण) आणि जॉन नाझारेथ (सांताकूझ) यांचा समावेश आहे. गट समित्यांची निवड पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे.