प्रजासत्ताक दिनी दिल्लीत दिमाखदार संचलन

0
97

देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन काल नवी दिल्ली येथे राजपथावर उत्साहाने साजरा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजपथावर तिरंगा फडकावला. तत्पूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना सलामी दिली. यावेळी तीनही सेनाप्रमुखही उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट राजपथावर दाखल झाले. तिथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांना अभिवादन केले.
यानंतर झालेल्या संचलनात काल मंगळवारी देशाचे सैन्य सामर्थ्य तसेच सांस्कृतिक वारशाची झलक पहायला मिळाली. यावेळी संचलनात पहिल्यांदाच भारतीय संचलनात राफेल या अत्याधुनिक लढाऊ विमानांसह टी -९० रणगाडे,