प्रकाश जावडेकर यांच्याकडून इफ्फीच्या पोस्टरचे अनावरण

0
132

नोव्हेंबर महिन्यात राज्यात होऊ घातलेल्या ५२व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात इफ्फीच्या पोस्टरचे काल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अनावरण केले.

५२वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या दरम्यान होणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले. इफ्फीच्या नियमावलीची माहिती देणार्‍या एका पुस्तिकेचेही त्यांनी प्रकाशन केले.