पोलीस प्रशिक्षण केंद्रातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

0
122

जनरेशन नेक्स्ट फॉर गोवा या भ्रष्टाचारविरोधी वाहिनीने पोलीस प्रशिक्षण केंद्रात चालू असलेल्या कथित भ्रष्टाचारासंबंधी पोलीस महासंचालक टी. एन्. मोहन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या भ्रष्टाचारासंबंधीचे कागदोपत्री पुरावे असलेले साहित्य जाळून टाकण्यात आले असल्याची माहिती वाहिनीच्या पदाधिकार्‍यांना मिळालेली असून हे पुरावे कोणी जाळून टाकले त्याची चौकशी पोलीस महासंचालकानी करावी, अशी मागणी वाहिनीचे अध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.यावेळी वाहिनीचे अन्य पदाधिकारी चंद्रमोहन भाटीया व अनिता फर्नांडिस यांनीही याप्रकरणी तात्काळ चौकशीची मागणी केली. पोलीस महासंचालकानी वरील प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षकाना चौकशीचे आदेश दिले होते. पार्श्‍वभूमीवर त्यांनी तात्काळ जाऊन आवश्यक ती कागदपत्रे ताब्यात घ्यायला हवी होती. मात्र, ती घेण्यात न आल्यानेच त्याचा फायदा उठवत ती जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप वरील पदधिकार्‍यांनी केला तसेच या प्रकरणी चौकशी केली जावी, अशी मागणी केली.