पेगासस प्रकरणावरून ममता बॅनर्जींची टीका

0
89

गेल्या काही दिवसांपासून देशात पेगासस प्रकरणावरून विरोधक केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. देशातील अनेक राजकीय नेते, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन पेगासस स्पायवेअरच्या मदतीने हॅक केले गेल्याचा आरोप विरोधककरत आहेत. तर केंद्र सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पेगाससप्रकरणी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पगाससमुळे मी माझा फोनच प्लास्टर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर तीव्र टीका केली. ३.७ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलमधून गोळा केले आहेत. हा पैसा ते कुठे खर्च करत आहेत. लोकांना लस, औषधे मिळत नाहीत. पीएम केअर फंड कुठे आहे? असाही सवाल त्यांनी केला. पेगासस मुद्द्यावरून बोलताना, आता पेगासस आल आहे. मी तर माझा फोन प्लास्टर करून टाकला आहे.

कॅमेर्‍यामध्ये सगळे रेकॉर्ड केले जाते. त्यामुळे मी पूर्ण कॅमेर्‍यालाच प्लास्टर लावून टाकले आहे. केंद्र सरकारातील मंत्र्यांचेही फोन हॅक केले जातात असे सांगितले. यावेळी त्यांनी, लोकशाही प्रसारमाध्यमे, न्यायपालिका आणि निवडणूक आयोगामुळे बनते. परंतु पेगाससने या तिघांनाही निगराणीखाली आणल्याचे त्यांनी म्हटले आहे.