पुलवामा येथील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0
159

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे काल शुक३वारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जवान व दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी सकाळी पुलवामातील काकापोरा भागात ही चकमक झाली. चकमकीत सहभागी झालेले दहशतवादी हे स्थानिक होते आणि एका तीन मजली इमरतीत लपून बसले होते.

जवानांनी स्फोटकांद्वारे ही इमारत उडवली. त्यांनतर या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर स्फोटके व शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.