पुरावे नसल्याने हाफीजला पकडणे अशक्य : पाकिस्तान

0
121

पत्रकार वेद प्रताप वैदिक व मुंबई हल्ल्यातील सूत्रधार हाफीज सईद यांच्या भेटीचा विषय गाजत असतानाच, या भेटीबद्दल कल्पना नव्हती असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. हाफीजविरुद्ध काहीही पुरावा नाही त्यामुळे त्याला अटक करणेही शक्य नसल्याचे पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितले. प्रेस क्लब इंडियाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी असेही स्पष्ट केले की हाफीज-वैदिक भेटीशी पाकिस्तानचा काही संबंध नसून ही दोन नागरिकांची खासगी भेट होती. हाफीजला तुरुंगात टाकण्यासाठी सज्जड पुरावे हवेत, कोणी तरी म्हणतोय म्हणून त्याला अटक करून तुरुंगात डांबता येणार नाही, असे सईद यांनी नमूद केले. वैदिक यांना पाकिस्तान यापुढेही व्हिसा देणार का ? या प्रश्‍नावर वैदिक यांनी अनेकदा पाकिस्तानचे दौरे केले आहेत, यावेळी ते शिष्टमंडळासाबेत परिषदेला गेले होते व त्यांनी सर्व कागदपत्रे सादर केली होती, असे उच्चायुक्तांनी सांगितले. दरम्यान, रामदेव बाबांचे निकटवर्तीय पत्रकार वैदिक यांच्या हाफीजशी भेटीवरून बराच वाद निर्माण झाला होता. संसदेतही त्याचे पडसाद उमटले होते. विरोधकांनी मागणी लावून धरल्यानंतर भारताने आपल्या पाकिस्तानमधील उच्चायुक्तांकडून अहवाल मागवला होता. त्यानंतर उच्चायुक्तांना याबाबत काहीही कल्पना नव्हती असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले होते.