पीओकेबाबत सरकारने निर्णय घ्यावा; सैन्य सज्ज आहे ः रावत

0
118

पाकव्याप्त काश्मीरबाबत (पीओके) सरकारने निर्णय घ्यावा, आपले सैन्य प्रत्येक गोष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे अशी प्रतिक्रिया देशाचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी अलीकडेच ३७० कलम झाल्यानंतर आता सरकारचा पुढील कार्यक्रम हा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे आणि त्याला भारताचा भाग बनविणे हा असल्याचे म्हटले होते. त्या अनुषंगाने रावत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रावत म्हणाले, ‘अशा प्रकरणांसंदर्भात सरकार कृती करत असते. देशाच्या संस्था सरकारच्या आदेशाप्रमाणे काम करत असतात. लष्कर नेहमीच तयार आहे.’ पीओकेबाबत निर्णय घेण्याचे काम सरकारचे आहे याकडे रावत यांनी लक्ष वेधले.
रावत पुढे म्हणाले, काश्मीरी जनतेने लक्षात घ्यायला हवे की काश्मीरात जे काही होत आहे ते त्यांच्या चांगल्यासाठीच होत आहे. ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीर संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे. याचा अनुभव येथील लोकांना येईल. इथल्या लोकांनी ३० वर्षे दहशतवादाचा सामना केला. आता तेथे शांतता येईल तेव्हा तिथली व्यवस्था कशी असते त्याचा अनुभव या लोकांना मिळेल.