पावसामुळे मुंबईसह कोकणात रेड अलर्ट

0
59

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत असून आता मुंबईसह कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काल बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले. कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी आल्याने रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती.