पावसाचा दहा वर्षांतील उच्चांक

0
292

>> यंदा आतापर्यंत १५९ इंच, ३९ टक्के जास्त पाऊस

राज्यात मोसमी पाऊस आत्तापर्यंत १५८.७१ इंच एवढा नोंद झाला असून मागील दहा वर्षांतील पावसाची उच्चांकी नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३९ टक्के जास्त आहे. दरम्यान, मागील चोवीस तासात ५.२२ इंच पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पावसाचे प्रमाण थोडे कमी झाल्याने सखल भागातील नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे.

गत २०१९ मध्ये मोसमी पाऊस १५५ इंच एवढा नोंद झाला होता. राज्याला सोमवारी जोरदार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. राज्यातील तेराही विभागात ४ इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे सर्वाधिक ७.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे.
मुरगावपाठोपाठ पणजी येथे ६.८२ इंच आणि दाभोली येथे ६.४८ इंच, फोंडा येथे ५.३१ इंच, मडगाव येथे ४.९६ इंच, पेडणे येथे ४.९५ इंच पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.

पेडण्यात १९१ इंच पाऊस
या वर्षी आत्तापर्यंत पेडण्यात १९१.६५ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पेडण्यात इंचांचे द्विशतक पूर्ण करू शकतो. केपे येथे १७३.९८ इंच, साखळी येथे १७१.३१ इंच, काणकोण येथे १७०.२९ इंच, फोंडा येथे १७०.१५ इंच, सांगे येथे १६५.८९ इंच, ओल्ड गोवा येथे १६५.६३ इंच, पणजी येेथे १४७.९० इंच, मडगाव येथे १३८.३९ इंच, म्हापसा येथे १३७.३४ इंच, दाभोली येथे १३६.५९ इंच, मुरगाव येथे १३६.०९ इंच पावसाची नोंद झाली आहे.