पार – उसगाव येथे अपघातात एक ठार

0
89

>> सलग दुसर्‍या दिवशी रस्ता अपघातात बळी

पार – उसगाव येथील नेस्ले कंपनीजवळ काल गुरूवारी संध्याकाळी चारचाकी वाहन आणि मोटरसायकल यांच्या झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार विठ्ठल बाबू फोंडे (३२ वर्षे, बोळकर्णे – साकोर्डा ) यांचे निधन झाले.

उसगाव येथे बुधवारी झालेल्या एका वाहन अपघातात एक युवक व एका युवतीचे निधन झाले होते. तर गुरूवारी पार उसगाव येथे झालेल्या वाहन अपघातात एकाचे निधन झाले. या अपघातात मोटरसायकलस्वार विठ्ठल फोंडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना इस्पितळात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, सलग दुसर्‍या दिवशीही उसगाव येथे रस्ता अपघातात आणखी एकाचा नाहक बळी गेल्याने वाहनचालक धास्तावले आहेत. सुसाट वाहने चालवणार्‍यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.