पार्थ पवार आणि त्यांच्या पार्टनर यांच्या मुंढवा येथील जमीन व्यवहारप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुणे शहरातील जमीन व्यवहारातील अनियमिततेच्या संशयावर तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे कार्यकाळातील सर्व निर्णय-आदेश यांची तपासणी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल सांगितले.
बोपोडी आणि मुंढवा भागातील सरकारी जमिनीच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेत येवले यांच्या आदेशांमध्ये कायद्याच्या चौकटीबाहेर काम झाल्याचा संशय आहे. ज्यामध्ये पार्थ पवार यांची कंपनी आहे.
या संदर्भात स्वाक्षरीविना किंवा नियमशीर प्रक्रियेशिवाय निर्णय घेण्यात आले असल्याचे तपासात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी, त्या आदेशांचे प्रत्यक्षात हस्तांतरण झालेले नाही असे सांगून निलंबन हा तात्पुरता निर्णय आहे. त्यांचे सर्व आदेश आणि त्यांचा कालखंड तपासला जाणार आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर पद उपनति, पगारवाढ रोखणे किंवा इतर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

