पाकिस्तानमध्ये आत्मघाती बॉंबस्फोटात १० जण ठार

0
103

पाकिस्तानमधील लाहोर शहरातील योहानाबाद भागात काल दुपारी करण्यात आलेल्या आत्मघाती बॉंबस्फोटात १० जण ठार, तर ५० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. रोमन ख्रिश्‍चन आणि ख्रिस्त चर्चला लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात चर्च असलेल्या भागात हे आत्मघाती स्फोट करण्यात आले. जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींमध्ये महिला तसेच लहान मुलांचा जास्त समावेश आहे.