पश्‍चिम बंगाल, आसामात आज दुसर्‍या टप्प्यासाठी मतदान

0
156

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज गुरूवारी विधानसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्प्यातील मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात ४ जिल्ह्यांमधील ३० जागांसाठी मतदान होईल. तर आसाममध्ये ३९ मतदारसंघांसाठी मतदान केले जाईल. शांततेत मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज गुरूवारी विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. बंगालमध्ये ७५,९४,५४९ मतदान आपला मतदानाचा हक्क बजावतील. या ठिकाणी एकूण १७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच मतदानासाठी १०,६२० मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. आसाममध्ये दुसर्‍या टप्प्यात ३४५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यात २६ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

नंदीग्राममध्ये जमावबंदी
नंदीग्राममध्ये आज मतदान होणार आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी व त्यांच्याविरोधात तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी हे मैदानात आहेत. यामुळे या मतदारसंघात मतदान शांततेत होण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.