मनोहर पर्रीकर यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेणारे त्यांचे चरित्र एप्रिल महिन्यात बाजारात येणार आहे. ‘पेंग्विन रेण्डम हाऊस’ या प्रकाशन संस्थेने छापलेले हे पुस्तक गोव्यातील पत्रकार सद्गुरु पाटील व मायाभुषण नागवेकर यांनी लिहिले आहे. इंग्रजीतील या चरित्राची पेंग्विनने सोमवारी घोषणा केली होती. सद्गुरु पाटील यांनी ‘गोव्याचे राजकारण व पर्रीकर’ असा विषय घेऊन एक पुस्तक लिहिलेले आहे. यावेळी पाटील व मायाभूषण यांनी पूर्ण नव्या पुस्तकाची निर्मिती पेंग्विनसाठी केलेली आहे.