पर्तगाळ मठाधीश विद्याधिराजतीर्थ स्वामी समाधिस्थ

0
108

पर्तगाळी येथील श्र्‌री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्र्‌रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांवर सर्व धार्मिक उपचार, वेदघोष आणि मंत्रघोषांसहित पर्तगाळी येथील वृंदावनस्थळी समाधिस्त करण्यात आले. स्वामी महाराजांचे सोमवार दि. १९ जुलै रोजी दुपारी ११.४५ वा. महानिर्वाण झाल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून वृंदावनस्थाचा विधी संपेपर्यंत पहाटे पाच वाजले होते. कर्नाटकातून आलेल्या खास आचार्य आणि पुरोहितांचा वेदघोष आणि स्वामी महाराजांचे पट्टशिष्य श्र्‌रीमद् विद्याधिशस्वामी महाराजांच्या आदेशानुसार शोकाकुल अनुयायांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधीचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. कोरोना महामारीचा विचार करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विधी पूर्ण करण्याचा आदेश स्वामी महाराजांचे पट्टशिष्य श्र्‌रीमद् विद्याधिशस्वामी महाराजांनी दिला होता. सर्व सोपस्कार त्यांच्याच उपस्थितीत आणि आदेशानुरूप करण्यात आले.

स्वामी महाराजांचे गोव्यासहित कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात असंख्य अनुयायी असून स्वामी महाराजांच्या निर्वाणाची खबर मिळताच कर्नाटक तसेच अन्य भागांतून शेकडो अनुयायांनी पर्तगाळी मठात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

हा सर्व विधी संपेपर्यंत पर्तगाळी जीवोत्तम मठ समितीचे अध्यक्ष श्र्‌रीनिवास धेंपे, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मठ समितीचे सदस्य पांडुरंग ऊर्फ भाई नायक, पुतू पै आणि अन्य सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. स्वामी महाराजांच्या आदेशानुसार येत्या २८ जुलैपासून पर्तगाळी मठातच यंदाचा चातुर्मास आयोजित करण्यात आला होता. मात्र स्वामी महाराजांच्या आकस्मिक महानिर्वाणामुळे चातुर्मास व्रताचरणात बदल होण्याची शक्यता आहे. चातुर्मासानंतर यासाठी शिष्य स्वामी विद्याधिशस्वामी महाराजांचा पट्टाभिषेक कार्यक्रम सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मठ समितीचे अध्यक्ष श्र्‌री. धेंपे यांनी दिली.

पर्तगाळी मठाधीशांच्या महानिर्वाणामुळे विशेषतः सारस्वत समाजाची फार मोठी हानी झाली आहे. विविध प्रांतात विखुरलेल्या समाजबंाधवांना संघटित करण्याबरोबरच सर्व समाजाला एकत्रित करण्याचे स्वामींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त करत स्वामींना श्र्‌रद्धांजली अर्पण केली आहे.