पन्नूकडून एअर इंडियाला बॉम्बस्फोटाची धमकी

0
3

गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक विमान कंपन्यांना त्यांचे विमान बॉम्बने उडवून देण्याच्या 100 हून अधिक धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्यांमुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळ आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यात आता खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूने उडी घेतली आहे. पन्नूने एअर इंडियाची विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे.

जारी केलेल्या व्हिडिओत पन्नूने म्हटले आहे की, नोव्हेंबर 1984 शीख दंगलीचा 40वा स्मृतिदिन आहे. 1984 मध्ये 13 हजारांहून अधिक शीख, महिला आणि मुले मारली गेली. आजही दिल्लीत विधवा वसाहत आहे. ही संपूर्ण घटना भारत सरकारने घडवून आणली. परदेशात प्रवास करणाऱ्यांनी 1 ते 19 नोव्हेंबरपर्यंत एअर इंडियावर बहिष्कार टाकावा.
गुरपतवंतसिंग पन्नूने शीख फॉर जस्टीस नावाची संघटना स्थापन केली आहे. ही संघटना सातत्याने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे.