पत्रादेवी येथील अबकारी तपासणी नाक्यासमोर एमएच 08 एपी 1727 या ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्यामुळे डॅनी फर्नांडिस (28, इन्सुली, सावंतवाडी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल बुधवारी 23 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पत्रादेवी पोलिसांनी घटनेचा पंचना केला. पत्रादेवी येथील तपासणीनाक्यासमोर एमएच 07 एके 7296 या दुचाकीने डॅनी जात होता. त्यावेळी या युवकाला सदर ट्रकने धडक दिल्यानंतर डॅनी याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना न देता संशयित ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

