पणजी महापालिका आयुक्तपदी संजीत रॉड्रिग्स यांची नियुक्ती

0
111

पणजी महानगरपालिकेचे आयुक्त शशांक त्रिपाठी (आयएएस) यांची बदली करण्यात आली असून त्यांची क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त ताबा संजीत रॉड्रीगीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यासंबंधी सरकारी पातळीवर आदेश काल जारी करण्यात आला आहे. व्ही. एम. प्रभुदेसाई यांची गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महिला व बाल कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांची बदली करण्यात आली असून त्यांची कौशल्य विकास खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण खात्याच्या संयुक्त संचालक दिपाली नाईक यांची महिला व बालकल्याण खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेंद्र मिरजकर यांची मडगाव रवींद्र भवनाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सगुण वेळीप यांची आदिवासी कल्याण खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मेघनाथ परब यांची गोवा गृहनिर्माण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डेरिक नेटो यांची गोवा मानव संसाधन विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.