पंजाबमध्ये पेट्रोल, डिझेलमध्ये दरकपात, मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
27

पंजाब सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १० रुपये आणि ५ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर रविवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. इंधनावरील मूल्यवर्धित कर कमी करण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याने राज्य सरकारला वर्षाकाठी ८०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे, असे पंजाबचे मंत्री मनप्रीतसिंग बादल यांनी सांगितले. इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकारने ही घोषणा केली आहे.