पँडोरा पेपर्समध्ये ३०० भारतीयांची नावे

0
34

>> सचिन तेंडुलकरसह अनिल अंबानींचाही समावेश

पँडोरा पेपर्समधील सात गोपनीय पत्रांचा तपशील समोर आला असून त्यात प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानींसह ३०० भारतीय उद्योजकांची नावे असल्याचे समोर आले आहे. त्यमुळे कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.

पँडोरा पेपर्सने सात गोपनीय पत्रांचा तपशील उघड केला आहे. श्रीमंतांनी कशा प्रकारे आपली संपत्ती कर बचत किंवा कर चुकवेगिरीसाठी लपवली आहे, याची माहिती या सात पत्रांत उघड झाली आहे. इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिस्ट या जागतिक पातळीवरील पत्रकारांच्या समूहाने विशेष शोधमोहीम राबवली. या दरम्यान कर चुकवेगिरीचे नंदनवन असलेल्या देशातील १४ कंपन्यांची गोपनीय माहिती तपासली असल्याचा दावा पँडोरा पेपर्सने केला आहे.

कर कायदयातील पळवाटा शोधून अनेक भारतीय उद्योजकांनी परदेशात संपत्ती लपवली असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. काल प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत दिवाळखोरीत निघालेल्या अनिल अंबानीपासून फरार हिरे व्यापारी नीरव मोदी यांचा समावेश आहे. भारतातून पलायन करण्यापूर्वी नीरव मोदी याच्या बहिणीने एक महिना आधीच परदेशात कशी ट्रस्ट स्थापन केली याची माहिती या मोहीमेदरम्यान हाती लागली आहे. तसेच नीरा राडिया, अभिनेता जॅकी श्रॉफ, कॅप्टन सतीश शर्मा, इक्बाल मिर्ची, विनोद अदानी, किरण मझुमदार शॉ, समीर थापर, अजित केरकर, पूर्वी मोदी या भारतीयांचा पहिल्या यादीत समावेश आहे.