न्हयबाग महामार्गावरील अपघातात पिता-पुत्र ठार

0
112

>> रस्त्याच्या बाजूला असलेल्यांना सुसाट ट्रॉलीने चिरडले : अन्य दोन गंभीर

पेडणे न्हयबाग-पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्ग १७ वरील धोकादायक वळणावर काल सकाळी १० वा. सुसाट वेगाने लोखंडाचे खांब घेऊन जाणारी ट्रॉली उलटल्याने भायीडवाडा-कोरगाव येथील मोहन पार्सेकर (५९) व रितेश पार्सेकर हे पिता-पुत्र जागीच चिरडले गेल्याने ठार झाले. तर साटेली सिंधुदुर्ग येथील महादेव बावकर, याचा एक पाय तुटल्याने गंभीर जखमी झाला. त्याच्याबरोबरील सुजय शिंदे हाही जखमी झाला. अपघात घडताच ट्रॉली चालक फरार झाला. संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग चार तास रोखून धरला. त्यामुळे बांदा ते धारगळ कोलवाळ पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात पाच वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. राष्ट्रीय महामार्गावर वाहने पार्क करून ठेवली होती व त्याठिकाणी उभे असलेल्या नागरिकांना जीव गमवावा लागला.
भायीडवाडा कोरगाव येथील मोहन पार्सेकर व रितेश पार्सेकर या पिता पुत्रावर काळाने झडप घातली. मोहन पार्सेकर हा गवंडी काम करीत होता. तर रितेश होम गार्ड म्हणून पणजी ट्रॉफिक सेवेत कार्यरत होता.
याबाबत वृत्त असे की, पणजी मार्गे बांदा एमएच ४६ एच ५४४५ ही ट्रॉली लोखंडी पाईप, खांब घेवून जात असता वळणावर ताबा गेला व ट्रॉलीतले सर्व लोखंडी सळ्या घेऊन कोसळली, सर्वत्र रस्ताभर हे सामान पसरले. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या वाहनानाही चिरडून व दोन व्यक्तीना चिरडून ठार मारले गेले.
मोटारसायकल बाजूला ठेऊन महादेव बावकर व सुजय शिंदे हे उभे होते. त्यांत महादेव यांचा एक पाय दोन वाहनात अडकून तुटला व तो गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
पाच वाहनांची नुकसानी
या अपघातात जीए ११ टी ०१ ०५ या प्रवासी रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. मालक सेबस्त्यांव फर्नांडिस यांनी रिक्षा पार्क करून ठेवली होती व चहाला गेले त्यामुळे ते बचावले. एमएच ०७ इए २२८२, जीए ०७ एच ९९०५ मोटारसायकल, जीए ०७ एच ९९०५ प्लेजर या वाहनांची बरीच नुकसानी झाली. तर त्याठिकाणी मार्कुस फर्नांडिस यांनी ट्रक पार्क करून ठेवला होता त्याचेही नुकसान झाले.
दरम्यान, सरकार कुणाचेही असो आपण जनतेसोबत असेन असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी घटनास्थळी येऊन संतप्त नागरिकांची समजूत काढताना सांगितले. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर हे स्थानिक पत्रकारांकडे बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उद्या ५ रोजी सकाळी दहा वाजता सर्व सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे. रस्त्यावर विभाजक घालण्याचे काम सुरु झाले नाही तर आपण मंगळवार दिनांक ६ रोजी लोकांसोबत रास्ता रोको करेन असा इशारा मंत्री आजगावकर यांनी यावेळी दिला.
संतप्त नागरीकांचा रास्ता रोको
वाहनचालकाच्या बेपर्वाईमुळे पिता पुत्राला अपघातात बळी द्यावा लागला. हा अपघात घडला त्यावेळी संतप्त जमावाने रास्ता रोको करून सर्वप्रकारची वाहतूक रोखून धरली. शिवाय मृतदेह हलवण्यास मनाई केली. जोपर्यंत मंत्री बाबू आजगावकर घटनास्थळी येऊन ठोस आश्वासन देत नाही व अधिकार्‍यांकडून उपाय योजनांची ग्वाही मिळत नाही तो पर्यंत मृतदेह हलवण्यास हरकत घेतली.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप, पोलीस उपधीक्षक महेश गावकर. पेडणे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, ट्राङ्गिक निरीक्षक सचिन नार्वेकर. पेडणे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर, पेडणे मामलेदार इशांत सावंत हजर होते व संतप्त नागरिकांची समजूत काढीत होते.
अग्नी शामक दलाच्या वाहनावर दगडङ्गेक
अपघात घडून लगेच घटनास्थळी पेडणे अग्नी शामक दलाचे वाहन पोचले नाही. त्यामुळे काही संतप्त नागरिकांनी या वाहनावर दगडङ्गेक करून आपला राग शमवला, पेडणे अग्नी शामान दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्याकडे संपर्क साधला असता खूप उशिराने ङ्गोन कॉल आल्यानंतर लगेच वाहन घटनास्थळी हजर झाल्याचा दावा केला .
निवेदनाना कचर्‍याची टोपली
या धोकादायक रस्त्यावर विभाजक घालावेत बाजूला संरक्षक भींत बांधावी यासाठी सरकारला वेळो वेळी लेखी निवेदन दिले. मात्र आजपर्यंत कोणतीच दखल घेतली नाही त्याबद्दल माजी सरपंच शरद कुडाव यांनी तीव नाराजी व्यक्त करून निदान आतातरी पर्यटनंमंत्र्याने दाखल घेऊन उपाय योजना करावी मागणी केली.
बेकायदा धाब्यांना नोटीस
राष्ट्रीय महामार्गावर जेवढे बेकायदा धाबे आहेत ,त्या सर्वाना नोटीस पाठवण्याचा आदेश पेडणे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर यांनी तातडीने दिला. मामलेदार इशांत सावंत यांनी सांगितले कि २४ तासांच्या आत सर्वाना नोटीस पाठवून चेक लिस्ट करण्यात यावे अशी सुचना संबधित पंचायतीच्या तलाठ्याना सांगितल्याचे सांगितले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वाहनांची मोडतोड व चक्काचुर झाला, शिवाय वाहनांचे टायर दुसरीकडे ङ्गेकले गेले. डीझेल रस्ताभर पसरल्याने पेडणे अग्नी शामक दलाच्या जवानांनी पाण्याचे ङ्गवारे मारून रस्ता साङ्ग केला.