न्यूड पार्टी ः महिला कॉंग्रेसची मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका

0
113

उत्तर गोव्यात न्यूड पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहिरात प्रसार माध्यमांवर वायरल होऊनही गोवा सरकारने संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल काल प्रदेश महिला कॉंग्रेस प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली.

कुतिन्हो म्हणाल्या की या न्यूड पार्टीच्या जाहिरातीमुळे राज्याचे नाव तर खराब झालेले आहेच. शिवाय राज्यातल्या महिलांचाही प्रतिमा खराब झाली आहे. जगभरातील लोकांनी तमाम माध्यमावरील ही जाहिरात पाहिली असून त्यामुळे गोव्याचे नाव कधी नव्हे एवढे बदनाम झाले असल्याचे त्या म्हणाल्या. आपणाला अमेरिका, ब्रिटनमधील काही गोमंतकीयांनी फोन करुन चिंता व्यक्त केल्याचे त्या म्हणाल्या.
या पार्टीची ज्या कुणी समाज माध्यमावरून जाहिरात केली होती त्या व्यक्तीला तसेच गोव्यातील त्यांच्या हस्तकला सरकारने ताबडतोब ताब्यात घ्यावे, अशी मागणीही कुतिन्हो यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी यासंबंधी परस्परविरोधी विधाने केल्याचाही दावा कुतिन्हो यांनी केला. सावंत यांनी नवी दिल्लीतील एका व्यक्तीने सदर जाहिरात समाज माध्यमावर अपलोड केली होती असे सांगितले. तर आजगांवकर यानी ती खोटी असल्याचे विधान केल्याचे कुतिन्हो म्हणाल्या. दिल्लीतील त्या व्यक्तीचा हस्तक उत्तर गोव्यात असल्याचा आरोप कुतिन्हो यांनी केला.

गोव्याची प्रतिमा ‘सेक्स डेस्टिनेशन’ अशी सरकारने होऊ देऊ नये, अशी मागणीही कुतिन्हो यांनी केली. गोव्याची अस्मिता आणि संस्कृती थोर असून तिला गालबोट लावू देऊ नये असे सांगून कौटुंबीक पर्यटनासाठीचे स्थळ अशी राज्याची प्रतिमा निर्माण व्हायला हवी, असे कुतिन्हो म्हणाल्या.

चित्रपटांतून ख्रिस्ती
महिलांचे वाईट चित्रण
हिंदी चित्रपटांतून गोव्यातील महिलांवे वाईट असे चित्र रंगवण्यात येत असून प्रामुख्याने ख्रिस्ती समाजातील महिला या बार डान्सर अथवा वाईट चरित्र्याच्या महिला असल्याचे दाखवण्यात येत असते.

भाजप महिला मोर्चा
आता गप्प का?
नग्न पार्टीच्या जाहिरातीमुळे राज्याची प्रतिमा मलीन होऊ लागलेली असताना भाजप महिला मोर्चाच्या सदस्य मूग गिळून गप्प कशा आहेत. त्या गाढ झोपेत ओहत काय, असा सवालही प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. राज्यात कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असताना छोट्या छोट्या प्रश्‍नांवरुन या महिला मोर्चाच्या सदस्य रस्त्यावर येऊन आंदोलन करीत असत. आता न्यूड पार्टीच्या प्रश्‍नावरुन त्या रस्त्यावर का येत नाहीत, असा सवाल कुतिन्हो यांनी केला.