नोरो व्हायरसच देशात शिरकाव

0
10

भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग पकडला आहे. कोरोनाचा धोका असतानाच आता नोरो व्हायरस या नवीन आजाराने धास्ती वाढवली आहे. केरळमध्ये नोरो व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. नोरो व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. त्याची लागण झाल्यास अतिसार, उलट्या, मळमळ, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि ओटीपोटात वेदना होतात.

केरळच्या अल्पुज्जा जिल्ह्यातील कायाकुलम प्राथमिक शाळेतील मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ८ विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर या मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तिथेच उपचारांदरम्यान दोन मुलांना नोरोची लागण झाल्याचे समोर आले.