नेसाय अपघातात दुचाकीस्वार ठार

0
93

नेसाय येथे काल रेल्वे फाटकाजवळ दोन दुचाकींमधील अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. अभिषेक प्रसाद (वय २४, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. या अपघातात दुसरा दुचाकीस्वार हॅपी प्रधान (वय २१, मूळ रा. उत्तरप्रदेश) हा गंभीर जखमी झाला.

अभिषेक हा नेसाय येथून मुगाळीच्या दिशेने जात होता, तर हॅपी विरुद्ध दिशेने येत होता. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली. त्यात अभिषेक रस्त्यावर फेकला गेला. जखमी अवस्थेत त्याला इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.