नेपाळच्या पंतप्रधानपदी शेर बहादूर देऊबांची वर्णी

0
43

नेपाळी कॉंग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी कलम ७६ (५) अंतर्गत त्यांची नियुक्ती केली आहे. तत्पूर्वी, काळजीवाहू पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. नेपाळच्या पंतप्रधानपदी शेर बहादूर देऊबा यांची नेमणूक करण्याचा व विसर्जित केलेली संसद पुन्हा प्रस्थापित करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.