निशाद बखलेला विजेतेपद

0
192

कुकूज स्पोर्टस्‌ने अरिहंत स्पोर्टस् अकादमीच्या सहकार्याने आायेजित केलेल्या फोंडा तालुका व्हेटरन्स टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद निशाद बखले याने पटकावले. अंतिम फेरीत त्याने सतीश नमशीकर याचा पराभव केला. बाबय प्रभू स्मृती भवनमध्येस्थित अरिहंत अकादमीमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन कुकूज स्पोर्टस्‌चे मालक रायिल नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरिहंतचे अध्यक्ष जयवंत हम्मनवार, खजिनदार संतोष प्रभुदेसाई, क्रीडा भारती गोवाचे उपाध्यक्ष सुदेश ठाकूर आदी उपस्थित होते. अरिहंतच्या सचिव अनू मोडक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

थरारक अंतिम लढतीत निशादने १२-१०, १४-१२, ९-११, १४-१२ असा विजय संपादित केला. उपांत्य फेरीत निशादने अनिरुद्ध जोशी याचा ११-८, ११-३, ११-० असा तर सतीश नमशीकरने गौरीश बोरकरचा १३-११, ११-८, ६-११, ११-८ असा पराभव केला होता. संदीप खांडेपारकर, जीवन तळावलीकर, अनिल प्रभू गावकर व प्रदीप धोंड यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले होते. अनुष्का व तृषा हम्मनवार यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. सुकन्या ठाकूर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सुदेश ठाकूर यांनी आभार मानले.