नाफ्तावाहू जहाज ओढून बाहेर काढण्याचे प्रयत्न

0
237

दोनापावल मार्वेल येथे समुद्रात रुतलेले नूशि नलिनी हे नाफ्तावाहू जहाज एका टग जहाजाच्या साहाय्याने ओढून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.
नेदरलॅण्डच्या मास्टर मरिना या कंपनीने या जहाजातील धोकादायक नाफ्ता बाहेर न काढता जहाज एका टग जहाजाच्या साहाय्याने ओढून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. जहाज बाहेर काढण्यापूर्वी जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्यात येणार आहे, अशी माहिती यापूवी देण्यात आली होती. अरबी समुद्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या चक्री वादळाच्या वेळी मुरगाव बंदरात ठेवण्यात आलेले नलिनी हे नाफ्तावाहू जहाज भरकटत येऊन दोनापावल येथे खडकाळ भागात गेल्या २४ ऑक्टोबरला रुतले. या जहाजात २६०० मॅट्रिक टन नाफ्ता व इतर इंधन भरलेले आहे. दीड महिना उलटला तरी रुतलेले जहाज बाहेर काढण्यात यश प्राप्त झालेले नाही. धोकादायक नाफ्ता व इतर इंधनाने भरलेले जहाज ओढून बाहेर काढण्यासाठी भरपूर यंत्रसामग्री आणण्यात आली आहे. परंतु, रुतलेले जहाज जागेचे हालविण्यात मागील दोन तीन दिवसांत यश प्राप्त झालेले नाही.