पावसाळा आला की अनेक घरांमध्ये ओलावा येणे किंवा पााणीगळतीसारखे प्रकार घडतात. पण देशाच्या नव्या संसदेमध्ये अशा प्रकारे पाणीगळती होत असेल तर? काँग्रेसचे तामिळनाडूमधील खासदार मणिकम टागोर यांनी ‘एक्स’वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये यंदाच्या पावसाळ्यात देशाच्या नव्या संसदेत काय परिस्थिती उद्भवली आहे, हे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये संसदेच्या नव्या इमारतीमध्ये चक्क पाणीगळती होत असल्याचे दिसत आहे. तसेच ज्या ठिकाणी पाणीगळती होत आहे, त्या खाली बादली ठेवून ते पाणी जमा केले जात आहे. यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी संसदेतील पाणीगळतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.