नवीन शैक्षणिक वर्षास २१ जूनपासून प्रारंभ

0
71

राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षाला २१ जून २०२१ पासून प्रारंभ होणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी जारी केले आहे.
राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी १० मे ते १९ जून २०२१ पर्यंत देण्यात आली आहे. वर्ष २०२०-२०२१ च्या वार्षिक परीक्षेचा निकाल ७ मे २०२१ पूर्वी जाहीर करता कामा नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

शिक्षण खात्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मधील शैक्षणिक वर्षातील कामकाज आणि सुट्टीबाबत सविस्तर माहिती जारी केली आहे. प्रथम सत्र २१ जून ते २६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घेतले जाणार आहे. द्वितीय सत्र १७ नोव्हेंबर २०२१ ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान घेतले जाणार आहे.

गणेश चतुर्थी सुट्टी ९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२१, दिवाळी सुट्टी २७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर, नाताळ सुट्टी २४ डिसेंबर ते १ जानेवारी २०२२, उन्हाळी सुट्टी २ मे ते ४ जून २०२२ पर्यत देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षातील कामकाजाचे दिवस २२० पेक्षा कमी होता कामा नये, असे परिपत्रकात म्हटले आहे.