नवज्योतसिंग सिद्धूंनी दिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

0
36

पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी काल मंगळवारी, अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यासंदर्भात सिद्धू यांनी एक पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी पाठवले आहे. त्यात त्यांनी आपण कॉंग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून काम करत राहणार आहे. पंजाबचे भविष्य आणि पंजाबच्या कल्याणाच्या अजेंड्यासोबत कुठलीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे पंजाबच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यासोबत अनेक निर्णयांसंबंधी सिद्धू यांचे मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.