नदाल, ओसाका दुसर्‍या फेरीत

0
95

>> डॉमनिक थिम, स्टेफानोस त्सित्सिपासला पराभवाचा धक्का

स्पेनच्या द्वितीय मानांकित राफेल नदाल याने सरळ तीन सेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिल्मन याचा ६-३, ६-२,६-२ असा फडशा पाडत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या फेरीत नदालचा सामना ऑस्ट्रेलियाच्या थानिस कोकिनाकिस याच्याशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत कोकिनाकिस २०३व्या स्थानी आहे. महिला एकेरीत जपानच्या अव्वल मानांकित नाओमी ओसाका हिला रशियाच्या ऍना ब्लिंकोवा हिला हरविण्यासाठी तीन सेट झुंजावे लागले. ओसाकाने हा सामना ६-४, ६-७, ६-२ असा खिशात घातला. ओसाकासमोर दुसर्‍या फेरीत पोलंडची माग्दा लिनेट असेल.

पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाच्या चौथ्या मानांकित डॉमनिक थिम व ग्रीसच्या आठव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. क्रमवारीत ८७व्या स्थानावर असलेल्या इटलीच्या बिगरमानांकित थॉमस फॅबियानो याने थिमला ६-४, ३-६, ६-३, ६-२ असे अस्मान दाखवले. रशियाच्या आंद्रेव रुबलेवसमोर त्सित्सिपासची डाळ शिजली नाही. ३ तास ५४ मिनिटे चाललेल्या या लढतीत रुबलेव ६-४,६-७, ७-६, ७-५ असा सरस ठरला.

अन्य महत्त्वाचे निकाल
पुरुष एकेरी ः पहिली फेरी ः निक किर्गियोस (२८) वि. वि. स्टीव जॉन्सन ६-३, ७-६, ६-४, जॉन ईस्नर (१४) वि. वि. गुलेर्मो गार्सिया लोपेझ ६-३, ६-४, ६-४, फेलिक्स अलियासिमी (१८) पराभूत वि. डॅनिश शापोवालोव १-६, १-६,४-६, आलेक्झांडर झ्वेरेव (६) वि. वि. राडू आल्बोट ६-१, ६-३, ३-६, ४-६, ६-२, मरिन चिलिच (२२) वि. वि. मार्टिन क्लिझान ६-३, ६-२, ७-६, कॅरन खाचोनोव (९) पराभूत वि. वासेक पोस्पिसील ६-४, ५-७, ५-७, ६-४, ३-६, दुसरी फेरी ः ग्रिगोर दिमित्रोव वि. वि. बर्ना कोरिच (माघार)
महिला एकेरी ः पहिली फेरी ः स्लोन स्टीफन्स (११) पराभूत वि. ऍना कलिनस्काया ३-६, ४-६, सिमोना हालेप (४) वि. वि. निकोल गिब्स ६-३, ३-६, ६-२, आर्यना सबालेंका वि. वि. व्हिक्टोरिया अझारेंका ३-६, ६-३, ६-४, कॅरोलिन वॉझनियाकी (१९) वि. वि. याफान वांग १-६, ७-५, ६-३, पेट्रा क्विटोवा (६) वि. वि. डॅनिसा अलेर्टोवा ६-२, ६-४, बर्बारा स्ट्रायकोवा (३१) पराभूत वि. अलियोना बोलसोवा ३-६, ६-०, १-६, ऍनेट कोंटावेट (२१) वि. वि. सारा सोरिबेस टोर्मो ६-१, ६-१, दुसरी फेरी ः कॅरोलिना प्लिस्कोवा (३) वि. वि. मरियम बोल्कावाद्झे ६-१, ६-४