शहर विकासमंत्री डिसोझांची माहिती
एक वर्षाने होणार असलेली नगरपालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर घेण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच प्रभागांची पुनर्रचना करण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री फ्रान्सिस्क डिसोझा यांनी दिली. मडगाव येथे गोवा सरस २०१५ या ग्रामीण स्वयंरोजगार वस्तूंच्या प्रदर्शनाच्या समारोप समारंभावेळी त्यांनी सांगितले.‘अ’ श्रेणीच्या पालिकांमध्ये प्रभागातील मतदारांची संख्या दोन हजार, ‘ब’ श्रेणीतील प्रभागातील मतदाराची संख्या दीड हजार, तर ‘क’ श्रेणीतील एक हजार असणार आहे. त्यासाठी प्रभागाची संख्या वाढणार आहे. मडगाव पालिकेची संख्या तीस प्रभागांची होण्याची शक्यता आहे.
मडगाव पालिकेतील थकबाकी १० कोटीपर्यंत गेली आहे व प्रशासन डळमळीत झाल्याने नवीन लक्ष्मण या आयएएस अधिकार्याची मुख्याधिकारीपदी नेमणूक केली आहे.