धोनीला पाहूनच शिकलो ः बटलर

0
109

धोनीला पाहून खूप काही शिकायला मिळाले, असे इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने याने नुकतेच सांगितले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी माझा आदर्श खेळाडू आहे. आयपीएल दरम्यान, धोनीला पाहून खूप काही शिकायला मिळाले.

अत्यंत बिकट परिस्थितीतही चाहत्यांकडून येणारा दबाव सांभाळताना धोनी करत असलेला खेळ नक्कीच वाखाणण्याजोगा आहे, असे बटलर याने पुढे सांगितले. बटलरने लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लबला दिलेल्या या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, धोनीला पाहूनच संकटकाळात उत्तम कामगिरी करण्याचा धडा मिळाला. निश्‍चितपणेच ही फार मोठी गोष्ट आहे.’ बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो. बटलर पुढे बोलताना म्हणाला की, ‘भारतात खेळताना तुम्हाला एक प्रकारचा दबाव सहन करावा लागतो. आयपीएलमध्ये एक विदेश खेळाडू असण्यासोबतच तुम्ही त्या खेळणार्‍या चार खेळाडूंपैकी एक असता.

तुम्हाला माहित असते की, बाहेर जे चार खेळाडू बसले आहेत तेदेखील जागतिक स्तरावर खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रभावी खेळी करणे गरजेचे असते.