दोन ट्रकांच्या अपघातात गुजरातमध्ये ११ ठार

0
104

गुजरातमधील बडोदा येथील वाघोडिया येथे राष्ट्रीय महामार्गावर काल बुधवारी झालेल्या दोटन ट्रकांच्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात १७ जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल पहाटे दोन ते चारच्या सुमारास घडला.

अपघातात सापडलेल्या जखमींना तातडीने जवळच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले आहेत. या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या दुर्घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुःख व्यक्त केले आहे.