राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. त्यात राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार या दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. विशेषतः अजित पवार गटाने शरद पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदावरील निवड घटनेला धरून नसल्याचे स्पष्ट करत ते मनमानी पद्धतीने पक्ष चालवत असल्याचा आरोप केला. हा आरोप शरद पवार गटाने जोरकसपणे फेटाळून लावला. आमच्या पक्षातून केवळ एक गट बाहेर पडला आहे; पण मूळ पक्ष आमच्याकडेच आहे, असा दावा या गटाने केला. या प्रकरणी सोमवारी सायंकाळी 4 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.