देशात 2025 पर्यंत 10 हजार ईव्ही चार्जिंग स्टेशन्स

0
3

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

>> 500 चार्जिंग स्टेशन्सचा शुभारंभ

भारत सरकारने 2025 पर्यंत 10 हजार ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यासाठी 1500 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यासोबतच पंतप्रधानांनी देशात 20 लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) स्टेशन सुरू केले आहेत, त्यापैकी तीन महाराष्ट्रात सुरू करण्यात आले असल्याचे मोदी यांनी पुढे बोलताना सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी काल रविवारी महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर ते बोलत होते.
भारत सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान देत आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी या वाहनांच्या चार्जिंगबाबत लोकांच्या मनात प्रश्न होता. मात्र आता पंतप्रधानांनी देशात 500 नवीन चार्जिंग स्टेशन सुरू केले आहेत. यासोबतच पंतप्रधानांनी हरित ऊर्जेच्या क्षेत्रात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स आणि एलएनजी स्टेशन्सचीही सुरुवात केली. केंद्र सरकारने पुण्यात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू केल्या. पंतप्रधान मोदींनी देशात 500 नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन केले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदींनी केले. या योजनांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. चार्जिंग स्टेशन्समुळे आता देशवासीयांच्या मनात असलेल्या प्रश्नाला उत्तर मिळाले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करणारी वाहने खरेदी करण्यावर भर द्यावा असे मोदींनी म्हटले. यावेळी त्यांनी देशात 20 लिक्विफाइड नॅचरल गॅस स्टेशन सुरू केले आहेत अशी माहिती दिली.

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच, देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकारही सातत्याने पावले उचलत आहे. यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान देण्यासोबतच, चार्जिंगची सुविधा वाढवण्यार भर देत आहे. याच दिशेने आज सरकारने मोठे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.