देशातील पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा संसर्ग

0
48

भारतातील पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना संसर्ग झाला आहे. केरळमधील मेडिकलची विद्यार्थिनी असलेली महिला भारतातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठरली होती. तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या महिलेची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तर अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली आहे. या महिलेला शिक्षणासाठी दिल्लीला जायचे होते. त्यामुळे तिने आपल्या चाचण्या केल्या. त्यात तिची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली. तिची प्रकृती स्थिर असून, ती गृहविलगीकरणात आहे.