देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली असून, गेल्या २४ तासांत २१८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर २१४ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवीन कोरोना बळींसह देशातील मृतांची संख्या ५ लाख २१ हजार ९६५ इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ५४२ इतकी झाली आहे.
रविवारी दिवसभरात देशात १९८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी २५ लाख १० हजार ७७३ रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०३ टक्के इतका आहे.