देशाच्या तुलनेत गोव्यात बेरोजगारीचा दर जास्त

0
19

गोव्यातील बेरोजगारीचा दर १०.५ टक्के एवढा असून, देशपातळीवरील बेरोजगारीच्या दरापेक्षा तो जास्त आहे. राष्ट्रीय पातळीवरील बेरोजगारीचा दर ४.२ टक्के एवढा आहे, अशी माहिती राज्यसभेत कामगार व रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी खासदार लुईझिन फालेरो यांच्या प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात काल दिली.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे आयोजित नियतकालिक श्रम सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेली रोजगार आणि बेरोजगारीची आकडेवारी मंत्र्यांनी राज्यसभेसमोर सादर केली. या आकडेवारीनुसार, गोव्यातील १५ ते २९ वयोगटातील बेरोजगारीचा दर २५.८ टक्के (राष्ट्रीय सरासरी १२.९ टक्के), १५ ते ५९ वर्षे ११.१ टक्के (राष्ट्रीय सरासरी ४.६ टक्के) असा आहे.