देशभरात चोवीस तासांत ४२ हजार कोरोनाबाधित

0
38

देशभरात काल रविवारी पुन्हा एकदा ४० हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ४२ हजार ७६६ रुग्णांची नोंद करण्यात आली असून ३०८ रुग्ण दगावले आहेत. नव्या बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २९ लाख ८८ हजार ६७३ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत ४ लाख ४० हजार ५३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासांत ३८ हजार ९१ कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ३८ हजार ९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. देशात सध्या ४ लाख १० हजार ४८ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. रिकव्हरी दर सध्या ९७.४२ आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर २.६२ टक्क्यांवर असून हा दर गेल्या ७२ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.