देशभरातून पीएफआयचे २४७ सदस्य ताब्यात

0
5

देशातील अनेक राज्यांमध्ये काल दुसर्‍यांदा पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत २४७ जणांना ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशात ४४, कर्नाटकात ७२, आसाममध्ये २०, दिल्लीत ३२, महाराष्ट्रात ४३, गुजरातमध्ये १५ आणि मध्य प्रदेशातून २१ जणांना ताब्यात घेण्यात आले.

दिल्लीतही पीएफआयवर पोलीस कारवाई करण्यात आली. आतापर्यंत संपूर्ण दिल्लीतून ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील अनेक भागात आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकातील बिदर, कोलार, बागलकोट, विजयपुरा आणि मंगलोरमध्ये कारवाई करण्यात आली. येथे पीएफआयशी संबंधित ७२ लोकांना ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्रातही औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, पुणे, ठाणे आणि मुंबई येथून सुमारे ४३ जणांना ताब्यात घेण्यात आले.