दाबोळीत पर्यटक कारला आग लागून नुकसान

0
105

काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दाबोळी विमानतळ परीसरात पर्यटक कारला अचानक आग लागल्याने झालेल्या दुर्घटनेत सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.दाबोळी विमानतळ परिसरात क्र. जीए ०६ टी ०७५७ ही अलीशान मारूती एर्टीगा कार पार्कींग करून ठेवलेल्या ठिकाणी वाढलेल्या झाडा झुडपांना कुणीतरी आग लावल्याने सदर आगीने मोठा पेट घेतल्याने गाडीच्या मागच्या बाजूला लागली. तिथे अन्य सात आठ गाड्या होत्या; पण त्या गाड्यांतील चालक जवळच असल्या कारणाने त्यांनी तेथून आपापल्या गाड्या हलविल्याने त्यांच्या गाड्या सदर आगीच्या घटनेपासून वाचल्या. दरम्यान, आग लागलेल्या गाडीचा चालक तेजस परब हा कार पार्कींग करून प्रवाशांना आणण्यासाठी विमानतळावर गेला होता. तद्पूर्वी, या आगीची कल्पना येथील गाडीत असलेल्या चालकांनी वास्को आणि वेर्णा येथील अग्नीशामक दलाला दिली. त्यानंतर वास्को येथील अग्नीशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी धाऊन येऊन त्यांनी आग आटोक्यात आणल्याने कारचे मोठे नुकसान झाले नाही.