गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची दुसरी सत्र परीक्षा १५ मार्चपासून, तर दहावीची दुसरी सत्र परीक्षा १ एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
कोरोना महामारीमुळे गत वर्षापासून शिक्षण मंडळाने दोन सत्रात दहावी-बारावीची परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोना कालावधीत दहावी-बारावीच्या परीक्षा घेता न आल्यामुळे शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला होता.